वैदिक विज्ञान आणि भारतीय संंस्कृती

400.00

Category:

‘वैदिक विज्ञान आणि भारतीय संस्कृती’ हा ग्रंथ मूळ हिंदीतील ‘वैदिक विज्ञान और भारतीय संस्कृति’ या ग्रंथाचा प्रामाणिक मराठी अनुवाद असून तो माझे वडील प्रा. ना. बा. दीक्षित यांनी १९८२ साली पूर्ण केला. वेद, उपनिषदे आणि भारतीय संस्कृतीतील वैज्ञानिक विचार यांचा सखोल वेध घेणारा हा अभ्यासपूर्ण ग्रंथ त्यांच्या निधनानंतर अनेक वर्षे हस्तलिखित स्वरूपातच राहिला. वडिलांच्या लेखनसंपदेत हे हस्तलिखित पाहताना त्यातील ‘मृत्यूनंतरची स्थिती’ यांसारख्या प्रकरणांनी मला विशेष प्रभावित केले आणि हा मौल्यवान ठेवा वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार दृढ झाला.
प्रकाशनासाठी अनेक प्रयत्न करूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. अखेरीस ‘प्रिंट ऑन डिमांड’च्या साहाय्याने हे कार्य शक्य झाले. प्रूफ तपासताना वेद, सृष्टी, जीवात्मा, पितृतत्त्व, वर्णव्यवस्था, आश्रमव्यवस्था, संस्कार आणि भारतीय जीवनदृष्टी यांवरील विचार नव्याने उलगडत गेले. हा ग्रंथ केवळ तत्त्वज्ञान मांडत नाही, तर भारतीय संस्कृतीच्या वैज्ञानिक आणि आध्यात्मिक पायांची ओळख करून देतो.
डॉ. निर्मलाताई जोशी यांच्या मार्गदर्शनाने ग्रंथाला अंतिम स्वरूप मिळाले. कुटुंबीयांच्या सहकार्यामुळे वडिलांचे हे हस्तलिखित आज मुद्रित स्वरूपात वाचकांसमोर येत आहे. ही आमच्यासाठी त्यांच्या स्मृतीला वाहिलेली कृतज्ञ आदरांजली आहे.

Weight 0.368 kg

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “वैदिक विज्ञान आणि भारतीय संंस्कृती”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top