प्राचीन भारताचा समग्र इतिहास

290.00

Category:

आजकाल मित्रमंडळी, आपल्या कुटुंबातील लहानथोर, समाजमाध्यमं, दूरदर्शनवरील चर्चा यांमध्ये ‘भारताचा इतिहास’ या विषयावर उलटसुलट चर्चा सातत्याने ऐकायला मिळतात. आपण सर्वजण भारतातील ऐतिहासिक स्थळं, वास्तूंना भेटीही देतो, पर्यटन करतो. अशा प्रसंगी आपल्याला कोणी आपल्याच इतिहासाविषयी प्रश्न विचारले तर बुचकळ्यात पडायला होतं…का?
कारण, आपण आपल्याच इतिहासाचा कंटाळवाण्या पद्धतीने केलेला अभ्यास. एकविसावं शतक हे यादृष्टीने महत्त्वाचं शतक आहे. जागतिकीकरणाच्या या काळात माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड क्रांती झाली आहे. पर्यटनक्षेत्राचा विकास तर झालाय, पण त्याचे स्वरूप आणि संदर्भ बदलले आहेत.
आता आपण गोष्टीरूप, समजावून घेण्याकरता, आकलन होईल अशा पद्धतीने इतिहास वाचूया. विद्यार्थी, पर्यटक, अभ्यासक, जिज्ञासू वाचक या सगळ्यांना आवडेल असं भारताच्या प्राचीन इतिहासावरील पुस्तक ज्येष्ठ प्राध्यापक डॉ. सोपान शेंडे यांनी आपल्याकरता लिहिलं आहे.

Weight 294 kg
Dimensions 14 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “प्राचीन भारताचा समग्र इतिहास”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top