आधुनिक भारताच्या सामाजिक आणि राजकीय इतिहासात डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा गांधी हे दोन प्रभावी विचारप्रवाहांचे प्रतिनिधी मानले जातात. दलितांच्या हक्कांसाठी संघर्ष करणारे डॉ. आंबेडकर आणि सामाजिक समतेचा संदेश देणारे महात्मा गांधी यांचे विचार स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत भारतीय समाजमनावर प्रभाव टाकत आले आहेत. देशातील अनेक तरुणांप्रमाणेच पांडुरंग नाथूजी अर्थात बापूसाहेब राजभोज यांच्यावरही या दोन्ही विचारधारांचा खोल प्रभाव पडला.
चर्मकार समाजातील एका सामान्य कुटुंबातून आलेल्या या तरुणाने गावाच्या मर्यादा ओलांडून पुण्यासारख्या शहरात आपले वेगळे स्थान निर्माण केले. सामाजिक आणि राजकीय चळवळींमध्ये सक्रिय सहभाग घेत त्यांनी नेतृत्व, संघटन, वक्तृत्व, लेखन आणि जनसंपर्क या विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केले. समाजकारण आणि राजकारण यांचा समतोल साधत त्यांनी नगरसेवकापासून खासदारापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास घडवला.
प्रस्तुत ग्रंथात बापूसाहेब राजभोज यांच्या व्यक्तिमत्त्वाचा, कार्याचा, सामाजिक बांधिलकीचा आणि वैचारिक योगदानाचा सखोल वेध घेण्यात आला आहे. स्वातंत्र्यपूर्व आणि स्वातंत्र्योत्तर भारतातील एका महत्त्वपूर्ण, स्वतंत्र आणि प्रभावी व्यक्तिमत्त्वाची ओळख करून देणारे हे संशोधनपर लेखन डॉ. किशोर काजळे यांच्या अभ्यासपूर्ण दृष्टिकोनाचे द्योतक आहे. इतिहास, समाजशास्त्र आणि दलित चळवळींचा अभ्यास करणाऱ्यांसाठी हा ग्रंथ एक महत्त्वपूर्ण संदर्भग्रंथ ठरेल.





Reviews
There are no reviews yet.