आपल्या दैनंदिन जीवनाचा पाया शेतीवर उभा आहे. आपण खातो ते अन्न, जगण्यासाठी आवश्यक असलेले धान्य आणि जीवनावश्यक अनेक गोष्टी शेतकऱ्यांच्या अथक परिश्रमातूनच निर्माण होतात. आपल्या अस्तित्वाचा आणि शेतीचा अतूट संबंध असतानाही, शेती आणि शेतकरी यांना समाजात अपेक्षित तेवढे महत्त्व आणि लक्ष अनेकदा मिळत नाही. त्यांच्या संघर्षांकडे आणि कष्टांकडे दुर्लक्ष केले जाते, ही खंत आजही कायम आहे.
अशा परिस्थितीत एका तरुणीने शहरातील सुखसोयींचे जीवन मागे सोडून मातीशी नाते जोडण्याचा निर्णय घेतला. तिने स्वतःला पूर्णपणे शेतीच्या कार्यात झोकून दिले. शेतातील श्रम, ऋतूंचे बदल, पिकांचे संगोपन आणि निसर्गाशी असलेले जिव्हाळ्याचे नाते अनुभवताना ती शेतीत इतकी रमली की तिचे जीवन आणि शेती यांच्यातील सीमा पुसट होत गेली. शेती हा केवळ व्यवसाय नसून एक जीवनपद्धती आहे, याची तिला प्रचिती आली.
या अनुभवांतूनच ‘सत्यग्रहणार्थ शेती साधन’ हे विचाररूप आणि शब्दरूप झाले. स्वतःच्या नावापूर्वी अभिमानाने ‘शेतकरी’ हे बिरुद धारण करणाऱ्या प्रांजली यांनी शेतीतील अनुभव, निरीक्षणे आणि भावविश्व ‘निरुपणासह शेतीच्या ओव्या’ या स्वरूपात मांडले आहे. या ओव्यांमधून शेतीचे वास्तव, तिचे सौंदर्य आणि तिचे तत्त्वज्ञान उलगडते.





Reviews
There are no reviews yet.