बिगारी ते महापौर

250.00

Category:

हे पुस्तक लिहिण्याचे धाडस करण्यामागे एकच भावना आहे—ज्यांनी आयुष्यभर प्रेम, साथ, मार्गदर्शन आणि प्रेरणा दिली, त्या सर्वांच्या ऋणातून किमान काही अंशी तरी मुक्त होण्याचा प्रयत्न. जीवनाच्या प्रवासात अनेक व्यक्तींचे उपकार, सहकार्य आणि सद्भावना लाभत गेल्या. त्या सर्वांविषयी कृतज्ञता व्यक्त करणे, त्यांचे मनःपूर्वक आभार मानणे आणि नम्रपणे धन्यवाद अर्पण करणे, हाच या लेखनाचा मुख्य हेतू आहे.

माझ्यासारख्या सामान्य माणसाकडे देण्यासारखे फार काही नाही. परमेश्वराने दिलेले हे शरीर, श्रम करण्याची ताकद आणि दोन नम्र हात एवढीच माझी संपत्ती. म्हणूनच हे शरीर आपणा सर्वांसमोर विनम्रतेने झुकवून, जोडलेल्या हातांनी जाणून-अजाणतेपणी झालेल्या चुका, उणिवा आणि त्रुटींसाठी क्षमा मागतो.

ज्यांच्या जीवनात माझ्या कृतींमुळे, शब्दांमुळे किंवा सहवासामुळे थोडाही आनंद, आधार किंवा उपयोग झाला असेल, त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा आणि आशीर्वाद अर्पण करतो. तसेच ज्यांनी मला जसा पाहिला, जसा समजून घेतला किंवा जसा अनुभवला, त्या प्रत्येकाने आपल्या अंतःकरणातील प्रेम, आपुलकी आणि जिव्हाळ्याचा ओलावा जपून ठेवावा, हीच माझी नम्र अपेक्षा आहे.

या पांडुरंगाच्या कृपेवर जगणाऱ्या एका साध्या, ऋणी आणि कृतज्ञ जीवाची ही मनापासून व्यक्त केलेली भावना आहे.

Weight 332 kg
Dimensions 14 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “बिगारी ते महापौर”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top