भारत अमुचि माता

349.00

राष्ट्रवाद म्हणजे नेमकं काय?
आणि आजच्या काळात तो कसा असावा?
राष्ट्र, विवेक आणि धर्म यांचे भारतीय राजकीय विचारांतील नाते नेमके कसे गुंतले आहे? आजच्या राष्ट्रवादाच्या ज्वलंत प्रश्नांवर इतिहासाची प्रगल्भ जाणीव काय उत्तरे देऊ शकते?
आज राष्ट्रवादाभोवती जे वादळी चर्वितचर्वण सुरू आहे, त्या कोलाहलात ‘इतिहासाची अचूक जाणीव’ असणे किती आवश्यक आहे, हे सुगत बोस यांच्या लेखनातून प्रकर्षाने समोर येते.
सुगत बोस यांचा हा विचारप्रवर्तक ग्रंथ ‘धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद विरुद्ध धार्मिक साम्प्रदायिकता’ या प्रचलित आणि कृत्रिम द्वैताला भेदून पुढे जातो. देशभक्ती आणि विश्वनागरिकता यांच्यात वाद नसून एक आश्वासक संवाद उभा राहू शकतो, हे लेखकाने अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. इतिहासाच्या भक्कम पायावर भविष्यातील भारताचे स्वप्न पेरणारे हे पुस्तक म्हणजे विचार प्रक्रियेला दिलेली एक शांत, पण क्रांतिकारी गती आहे. आजच्या राजकीय आणि सामाजिक वास्तवाला समजून घेऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकाने वाचायलाच हवे असे पुस्तक

Weight 238 kg
Dimensions 14 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “भारत अमुचि माता”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top