संस्कृतीचे अर्थशास्त्र

250.00

भारत हा विविधतेने नटलेला आणि उत्सवप्रिय देश म्हणून जगभर प्रसिद्ध आहे. देशातील प्रत्येक राज्य, प्रदेश आणि समाजघटक यांची स्वतंत्र सांस्कृतिक ओळख असून रूढी, परंपरा, सण, उत्सव आणि धार्मिक सोहळ्यांची समृद्ध परंपरा येथे पाहायला मिळते. हिमालयापासून कन्याकुमारीपर्यंत विखुरलेली मंदिरे, तीर्थक्षेत्रे, यात्रा आणि त्याभोवती निर्माण झालेली व्यापारी व सामाजिक व्यवस्था ही केवळ सांस्कृतिक नव्हे तर आर्थिक दृष्ट्याही महत्त्वाची आहे. या सर्व घटकांच्या परस्परसंबंधातून एक स्वतंत्र आर्थिक संरचना विकसित होत असते.

संस्कृती, समाज, श्रद्धा, परंपरा आणि आर्थिक व्यवहार यांचा परस्परसंबंध समजून घेण्याचे कार्य ‘संस्कृतीचे अर्थशास्त्र’ हे अभ्यासक्षेत्र करते. सांस्कृतिक उपक्रम, धार्मिक कार्यक्रम, पर्यटन, कला, वारसा आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांच्यातील आर्थिक नातेसंबंधांचा सखोल उहापोह या विषयामध्ये केला जातो.

प्रस्तुत पुस्तक या महत्त्वपूर्ण विषयाची सर्वसमावेशक ओळख करून देत सांस्कृतिक आणि आर्थिक व्यवहारांचे अनेक पैलू उलगडते. अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि संस्कृती-अभ्यास या क्षेत्रांतील विद्यार्थी, शिक्षक, संशोधक तसेच जिज्ञासू वाचकांसाठी हा ग्रंथ उपयुक्त ठरेल. अर्थशास्त्रीय मराठी साहित्यामध्ये ‘संस्कृतीचे अर्थशास्त्र’ या विषयावरील लेखनाद्वारे डॉ. अविनाश कुलकर्णी यांनी महत्त्वपूर्ण आणि मोलाची भर घातली आहे.

Weight 191 kg
Dimensions 14 × 21.7 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “संस्कृतीचे अर्थशास्त्र”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top