बा. सी. मर्ढेकर हे मराठी साहित्यातील अत्यंत प्रभावशाली आणि प्रतिभावान लेखक म्हणून ओळखले जातात. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण लेखनशैली, वैचारिक खोली आणि साहित्यिक प्रयोगशीलतेमुळे त्यांनी मराठी साहित्यविश्वावर अमिट ठसा उमटवला आहे. त्यांच्या कविता, कथा आणि समीक्षात्मक लेखनाचा अभ्यास अनेक साहित्य संशोधक आणि समीक्षकांनी केला असून, त्यांच्या साहित्यावर झालेल्या टीका आणि चर्चांनीही मराठी साहित्यविश्वात विशेष स्थान मिळवले आहे.समीक्षा हा वाङ्मयप्रकार मूलतः तत्त्वचिंतनाशी निगडित असल्याने साहित्यकृतींच्या सखोल आकलनासाठी तो महत्त्वाचा मानला जातो. साहित्य आणि तत्त्वज्ञानाचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. विवेक गोखले यांनी या ग्रंथामध्ये मर्ढेकरांच्या साहित्यावर लेखन करणाऱ्या टीकाकारांच्या विचारांचे चिकित्सक परीक्षण केले आहे. त्यांच्या संशोधनपर आणि विश्लेषणात्मक लेखनातून मर्ढेकरांच्या साहित्यावरील समीक्षेचे नवे पैलू उलगडून समोर येतात. त्यामुळे मराठी वाचकांना आणि अभ्यासकांना मर्ढेकरांविषयीच्या चर्चेचे एक नवीन आणि समृद्ध दालन उपलब्ध होते.



Reviews
There are no reviews yet.