संन्यासी हा शब्द उच्चारला तरी मनात काय येतं? विरक्ती? ज्ञानी माणूस की बुवाबाजी? संन्यासी कोण असतात? ते शिकलेले असतात का? त्यांचे पूर्वायुष्य त्यांच्या वर्तमान तसेच भविष्यकाळात डोकावते का? मुळात ते संन्यासी का होतात?
फार कमी लोकांच्या आसपास संन्यासी असतात, त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे अनेकांना माहीत नसतात. पण आपलं कुतूहल आवडणारं मन, नकळत अनेक गोष्टींचा शोध घेत असतं!
संन्यासी फसवे नसतात! त्यांच्या मुळाशी काहीतरी असे तत्त्व असते, जे त्यांचे आयुष्य बदलून टाकते! काय असतं ते तत्त्व?
वाचूया एका संन्यासींंची कथा! कलकत्त्याच्या श्रीमंत बंगाली घरात जन्मलेल्या आणि महाराष्ट्रात चाळीसगावला आपला सर्व शिष्यपरिवार असलेल्या स्वामी प्रणवानंद यांनी आपलं आयुष्य वाचकांसमोर उघड केलं आहे. लहानपणी बंडखोर असलेला हा मुलगा. ‘कालीमठ’ ही आहे त्यांची आत्मकथा! ही संन्यासयात्रा त्यांनी स्वतःच आपल्याला सांगितली आहे.
| Weight | 0.181 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 21.5 cm |






Reviews
There are no reviews yet.