हर्णेचा सागरपुत्र-शिवा तांडेल

150.00

Category:

माझ्या भ्रमंतीदरम्यान समुद्रकिनारी वसलेल्या गावांतील अनेक लोकांशी जवळून परिचय झाला. या भेटीगाठींमधून कोळी समाजाचे जीवन, त्यांची संस्कृती, परंपरा, संघर्ष, आनंद-दुःख आणि समुद्राशी असलेले त्यांचे अतूट नाते अनुभवण्याची संधी मिळाली. या अनुभवांनी मनावर खोल ठसा उमटवला आणि त्यातूनच या कादंबरीची बीजे रुजली.
कादंबरी लिहिण्याचा विचार मनात आला तेव्हा कोळी समाजाच्या जीवनातील अनेक सूक्ष्म पैलू माझ्यासाठी अपरिचित होते. मात्र हर्णे येथील मा. श्री. अण्णा पाटील, श्री. सोमनाथ पावशे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी अत्यंत आत्मीयतेने सहकार्य केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे आणि अनुभवकथनांमुळे मला या समाजाचे वास्तव अधिक जवळून समजले. त्यांच्या सहकार्याशिवाय या कादंबरीला वास्तवाचा स्पर्श आणि जीवन्तता लाभणे शक्य झाले नसते.
प्रस्तुत कादंबरी ही केवळ एक साहित्यकृती नसून कोळी समाजाच्या जीवनाला, त्यांच्या संघर्षांना आणि सांस्कृतिक वैभवाला वाहिलेली आदरांजली आहे. त्यामुळे ही कादंबरी हर्णेचे मा. श्री. अण्णा पाटील, समस्त पावशे कुटुंबीय आणि हर्णे गावातील सर्व नागरिक यांना कृतज्ञतापूर्वक अर्पण करताना मला विशेष आनंद आणि समाधान वाटते. त्यांच्या प्रेम, सहकार्य आणि विश्वासाचे ऋण मी सदैव मान्य करतो.

Weight 0.168 kg
Dimensions 14 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “हर्णेचा सागरपुत्र-शिवा तांडेल”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top