जगप्रसिद्ध *‘टाईम’* नियतकालिकाने १९२३ ते २००५ या कालखंडातील सर्वोत्तम शंभर इंग्रजी कादंबऱ्यांमध्ये समाविष्ट केलेली *‘अॅनिमल फार्म’* ही जॉर्ज ऑरवेल यांची एक अजरामर साहित्यकृती आहे. १९४५ मध्ये प्रकाशित झालेली ही कादंबरी केवळ राजकीय रूपककथा नसून सत्तेचे स्वरूप, मानवी स्वभाव आणि क्रांतीच्या अपयशाचे गहन विश्लेषण करणारी अभिजात कलाकृती आहे.
उच्च आदर्श आणि समानतेच्या स्वप्नांनी प्रेरित झालेल्या क्रांतीचे नेतृत्व करणारे शासक कालांतराने कसे सत्तालालसेचे बळी ठरतात, कसे स्वार्थी, कपटी आणि जनतेचे शोषण करणारे बनतात, याचे अत्यंत प्रभावी आणि अस्वस्थ करणारे चित्रण ऑरवेल यांनी या कादंबरीत केले आहे. सत्तेचा गैरवापर, प्रचारतंत्र, सत्याचे विकृतीकरण आणि लोकांच्या स्वातंत्र्यावर होणारे आक्रमण या विषयांना त्यांनी विलक्षण ताकदीने स्पर्श केला आहे.
जरी ही कादंबरी विशिष्ट ऐतिहासिक पार्श्वभूमीवर आधारित असली, तरी तिच्यातील आशय आजही तितकाच समकालीन आणि सार्वकालिक वाटतो. जगातील अनेक देशांप्रमाणेच आपल्या समाजातही विविध कालखंडांत या वास्तवाचे प्रतिबिंब पाहायला मिळते.
व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही मूल्ये आणि सत्तेच्या मर्यादांचे महत्त्व समजून घेण्यासाठी अॅनिमल फार्म हे पुस्तक प्रत्येक पिढीने वाचावे असे चिंतनप्रवर्तक साहित्य आहे. विशेषतः नव्या पिढीला स्वातंत्र्याचे मूल्य आणि त्याच्या संरक्षणाची गरज समजून देणारा हा एक महत्त्वपूर्ण ग्रंथ ठरतो.
| Weight | 127 kg |
|---|---|
| Dimensions | 14 × 21.5 cm |





Reviews
There are no reviews yet.