गणेश ही महाराष्ट्रासह संपूर्ण भारतातील लाखो भाविकांची अत्यंत लाडकी देवता आहे. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव नसून आपल्या संस्कृती, परंपरा आणि सामाजिक जीवनाचा अविभाज्य भाग आहे. या परंपरेशी घट्टपणे जोडलेले आणि जागतिक स्तरावर ओळखले जाणारे नाव म्हणजे “पेणचे गणपती”.
एकेकाळी भिकाजीपंत देवधर यांनी घरगुती स्तरावर सुरू केलेल्या गणेशमूर्ती निर्मितीच्या कार्याने कालांतराने विशाल उद्योगाचे रूप धारण केले. आज पेण आणि परिसरातील अनेक गावांच्या अर्थव्यवस्थेचा हा प्रमुख आधार बनला आहे. स्थानिक कलावंतांच्या कौशल्यातून घडलेल्या या परंपरेने केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर देश-विदेशात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. जीआय मानांकन प्राप्त झालेल्या या उद्योगाचा प्रवास हा कला, श्रद्धा, उद्योजकता आणि नवकल्पनांचा प्रेरणादायी इतिहास आहे.
या पुस्तकात लेखक अविनाश कुलकर्णी यांनी एका धार्मिक प्रतिमेपासून जागतिक स्तरावरील ब्रँडपर्यंतचा हा उत्कंठावर्धक प्रवास प्रभावीपणे उलगडला आहे. गणेशमूर्ती निर्मितीतील कलात्मकता, सांस्कृतिक वारसा, व्यावसायिक विकास आणि सामाजिक परिवर्तन यांचा वेध घेत हे पुस्तक वाचकांसमोर एक वेगळी दृष्टी ठेवते.
उद्योजक, नवउद्योजक, व्यवस्थापन आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांचे विद्यार्थी, संस्कृती संशोधक, कलावंत तसेच प्रेरणादायी यशोगाथांमध्ये रस असणाऱ्या प्रत्येकासाठी हे पुस्तक मार्गदर्शक आणि प्रेरणादायी ठरणारे आहे.





Reviews
There are no reviews yet.