ग्रीक तत्त्ववेत्त्यांवरील निबंधांचा मराठी अनुवाद

225.00

तत्त्वज्ञान हा विषय सर्व विषयांचे मूळ आहे असे मानले जाते! एखाद्या विषयाच्या मुळाशी जाऊन कणाकणाने ज्ञान प्राप्त करणे म्हणजेच त्याचे तत्त्व जाणणे, अशा माणसाला तत्त्वज्ञानी किंवा तत्त्ववेत्ता म्हटलं जातं! जगाच्या प्रवाहात अनेक तत्त्ववेत्ते होऊन गेले, तेही सर्व देशांंत! तत्त्वज्ञानाचे काहीसे विज्ञानासारखे असते, जी मांडणी केली जाते, त्यावर इतर लोकही संशोधन करतात. आधीचे म्हणणे खरे ठरवतात किंवा खोडून काढतात.
भारतात तर तत्त्वचिंतकांची काहीच कमतरता नाही. एकोणिसाव्या शतकात भारतीय परंपरेला ग्रीक आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाची तसेच तेथील तत्त्वचिंतकांची ओळख झाली. त्यातून पुढे भारतीय आणि पाश्चात्त्य तत्त्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास सुरू झाला..
स्वतः उत्तम तत्त्वचिंतक असलेले गुरुदेव रानडे यांनी गीता, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम, समर्थ रामदास, संत एकनाथ यांच्या तत्त्वज्ञानावर प्रदीर्घ अभ्यास करून पुस्तके लिहिली. गुरुदेवांना पाश्चात्त्य आणि भारतीय तत्त्वज्ञानाचा तौलनिक अभ्यास करायचा मोह आवरता येणे अशक्य झाले असले पाहिजे! त्यांनी त्यांच्या या पुस्तकात ग्रीक तत्त्ववेत्ते आणि त्यांच्या मांडणीची ओळख त्यांनी भारतीयांना करून दिली. अरिस्टॉटल, झेनोफेनिस, मेलिसस, थेलीस, प्लेटो ही त्यातील काही महत्त्वाची नावे! तत्त्वज्ञानाचे गाढे अभ्यासक डॉ. बी. आर. जोशी आणि त्यांचे चिरंजीव प्रा. गिरीश जोशी या उभयतांनी या पुस्तकाचा रसाळ मराठी अनुवाद करून मराठी वाचकांना तत्त्वज्ञानाची वर्ल्ड टूर घडवली आहे!
हे पुस्तक तत्त्वज्ञानाचे अभ्यासक, विद्यार्थी, जिज्ञासू आणि गुरुदेवांचे अनुयायी यांना अभ्यासपर ठरले आहे! सामान्य वाचकाला सोप्या भाषेत अनेक विषयांची ओळख होऊ शकेल!

Weight 207 kg
Dimensions 14 × 21.5 cm

Reviews

There are no reviews yet.

Be the first to review “ग्रीक तत्त्ववेत्त्यांवरील निबंधांचा मराठी अनुवाद”

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top